Sunday, October 4, 2015

जगा, आणि जगू दया!



           जगातील सर्वात सुंदर व्यक्ती – लहान मूल.  निष्पाप, खोडकर, आनंदी, हट्टी, आकर्षक, निरागस, गोंडस अशा अनेक विशेषणांनी समृध्द असलेली ही ‘बाल मंडळी’.  जीवनाच्या प्रत्येक दिवसात कुटुंबाच्या संगतीने लहान मूल छोट्या-छोट्या गोष्टी शिकत असते.  ते बोबडे बोल, डोळ्यांत पाणी न आणताच  खोटे-खोटे रडणे, खेळण्यातला खट्याळपणा यांसारख्या मुलांच्या गोष्टी कितीतरी आल्हाददायक असतात! 

         जन्माला आल्यानंतर स्वत: रडून इतरांना आनंद देणारी ही मंडळी.  जन्म झाल्यानंतर बाळ रडते का?  असा प्रश्न मला नेहमीच पडतो.  नऊ महिने आईच बाळाची काळजी घेत असते.  परंतु जन्म झाल्यानंतर त्या बाळाला स्वत: श्वास घेण्यासाठी, भूक भागवण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार असतात.  आजूबाजूला असणारे कर्णकर्कश आवाज सहन करावे लागणार असतात.  जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच बाळाची जीवन जगण्याची खरी दिशा सुरु झालेली असते.  कदाचित म्हणूनच ते रडत असावे.

           आई-वडील ज्या प्रकारे आपल्या पाल्याला शिकवतील त्याप्रकारे ते शिकत जाते.  लहानपणी चांगले संस्कार केले तर ते मूल चांगले घडते.  ज्या गोष्टी कानांवर येतील त्याच गोष्टी लहान मूल बोलण्याचा प्रयत्न करते.  जीवनातील धडे शिकवण्याचे कार्य आई-वडिलांवर अवलंबून असते.  ते मूल्यशिक्षण देण्याचे कार्य घडणे गरजेचे आहे.

          जीवन ही एक वेल आहे, आणि सुखे त्या वेलीवर फुलणारी फुले आहेत.  जीवनाच्या या वेलीवर सुखांची फुले बहरण्यासाठी आनंदासोबतच आत्मविश्वासाची तसेच अधिकारांची गरज असते.  जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार प्राप्त झालेले आहेत. लहान मुलांनादेखील अनेक अधिकार आहेत.

          भारतीय संविधानानुसार लहान मुलांना सहभागाचा, जगण्याचा, ऐकण्याचा, शिक्षणाचा, संरक्षणाचा अधिकार आहे.  जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत मुलांचा सहभाग असणे गरजेचे आहे.  त्यांना त्यांचे जीवन आनंदाने जगण्याचा अधिकार आहे.  स्वतः वर होणाऱ्या अन्यायाचा सामना करण्याचा, स्वत:चे संरक्षण करण्याचा अधिकार मुलांना आहे. त्याचबरोबर शिक्षण घेण्याचा हक्क ही लहान मुलांना दिलेला आहे.
  
          सूरज की रोशनी पर, जीवन की हर ख़ुशी पर, हर एक हंसी और मुस्कान पर, दुनिया पर, जिंदगी पर, मेरा भी तो अधिकार है|
          बच्चे ही तो मुल्ख की तकदीर है, आनेवाले दौर की तस्वीर है,  इस स्कूल की सब रस्तो पर, किताब-कापी-पुस्तको पर, क्लासरूम-टीचर पर, लब्जो के हर अक्षर पर, मेरा भी तो अधिकार है|
           हो कितने मासूम कितने भोले है, इनके जैसा ना कोई दुजा है, हो इनके जीवन मै रोशनी लाना, एक इबादत है, एक पूजा है,  त्योहारो पर, मैदान-खेलों पर, चॉकलेट-बिस्कीट पर, फुटबॉल-क्रिकेट पर मेरा भी तो अधिकार है|
           किसी सुफी ने कहा था: चुपके बच्चो मै खुदा रहैता है, उतना ही प्यार पाओगे, जितना भी प्यार दोगे, इनको जीने का अधिकार दो, इनको जीने का अधिकार दो|

          जावेद अख्तर यांनी सुंदर शब्दात लिहिलेल्या आणि काही लहान मुले तसेच आदेश श्रीवास्तव, श्रेया घोषाल, सोनू निगम, शान, अलका यागनिक, हरिहरन, उदित नारायण, अभिजीत भट्टाचार्य या दिग्गज गायकांनी स्वरबद्ध केलेले हे गीत. यांत अतिशय योग्य प्रकारे बालकांचे अधिकार दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे.  मुलांना त्यांचे अधिकार, तसेच हे सुंदर जग पाहण्याचा, जगण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने आपल्या पाल्याला दिला पाहिजे.
      

No comments:

Post a Comment